Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वंचितच्या कामबंद आंदोलनाचा हर्षा कंपनीने घेतला धसका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक बेरोरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात वंचित ला यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. 24 मे 2024) -         राजुरा तालु्क्य...
स्थानिक बेरोरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात वंचित ला यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. 24 मे 2024) -
        राजुरा तालु्क्यातील साखरी गावात सुरू असलेल्या वेकोली च्या खुली खदानी मार्फत हर्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या या मागणीसाठी आज दिनांक 24 मे 2023 रोजी वंचीत चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. (Success of Vanchit in providing employment to the local unemployed) (rajura) (wcl ballarpur area)

        हर्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे (Harsha Private Limited) बहुतांश कामे पेसा अंतर्गत असलेल्या साखरी ग्रामपंचायत भागात चालतात त्यामुळे कंपनीच्या कामामुळे प्रदूषण, खराब रस्त्यांमुळे अपघात आणि वेकोलीच्या खदाणीमुळे येथील घरांना हादरे बसत आहेत, गावातील पाण्याच्या बोरिंगला तडा जात आहे यामुळे कंपनीच्या सर्व भार साखरी गाववासी सहन करत असतांना येथील बेरोजगार युवकांना हर्षा कंपनीने प्राधान्य न देता बाहेरील युवकांना रोजगार देत असल्याने (Vanchit Bahujan Aaghadi) वंचीत बहूजन आघाडीने याच्या निषेध करत 17 मे 2023 रोजी निवेदनाद्वारे स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी केली होती परंतू कंपनी ने दुर्लक्ष केले. त्यामुळे आज वंचित च्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले यात गावातील असंख्य बेरोजगार युवक, महिला व वृद्धांनी सहभाग घेतला. 

        खदाणीतून चालणारे असंख्य वाहने रस्त्यावर थांबवून चक्का जाम करण्यात आला. स्थानिकांना रोजगार द्या अश्या घोषणा करत आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या व्यवस्थापकांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली परंतु अवघ्या काही स्थानिक लोकांना घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्यात आले त्यानंतर कंपनीने धसका घेऊन आपली भूमिका बद्दलवत आंदोलकांच्या मागणीला होकार दिला व मागणीप्रमाणे रोजगारात क्षमतेप्रमाणे रोजगार देण्याचे लेखी हमीपत्र दिले, यामुळे वंचित बहूजन आघाडीच्या आंदोलनाने आता स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळणार. या निर्णयामुळे साखरी परिसरातील बेरोजगार युवकांनी एकच जल्लोष करीत वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे (Bhushan Phuse) यांचे आभार मानले.
        आंदोलनात वंचित बहूजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, राजूरा तालूका अध्यक्ष सुशिल मडावी, राजूरा तालूका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कोरपना तालूका संघटक अमोल निरंजने, युवा आघाडीचे शुभम मंडपे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, जेष्ट नेते रामदास चौधरी, जिल्हा महासचिव अल्का मोटघरे, जिल्हा संघटक अविताताई उके, जिल्हा कोषाध्यक्ष पुष्पलता कोटांगले, कार्यकर्त्या नम्रता साव, वैशाली दुबे तसेच साखरी गावातील असंख्य बेरोजगार युवक, महिला, वृद्ध अश्या शेकडो जणांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top