Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी विद्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी गडचांदूर (दि. २४ मे २०२३) -         महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे मह...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २४ मे २०२३) -
        महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ. स्मिताताई चिताडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते होते.  सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
        याप्रसंगी प्रा. नितीन वाढई यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात प्रा. नंदाताई भोयर, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले. (Gadchandur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top