Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रेती तस्करीचे पाच ट्रॅक्टर जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर  (दि. 11 मे 2023) -         जिल्ह्यातील रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन तसेच वाहतूक करण्यावर बं...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. 11 मे 2023) -
        जिल्ह्यातील रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन तसेच वाहतूक करण्यावर बंदी असताना काही लोक रेतीची मोठ्या प्रमाणात छुप्यामार्गाने तस्करी करीत आहेत. (Mass smuggling of sand)

        दरम्यान मंगळवारी पहाटे वर्धा नदीच्या शिवणी चोर येथून रेती वाहतूक करताना चंद्रपूर तहसीलच्या पथकाने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेत ट्रॅक्टर मालकांवर दंड आकारला आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रेतीची मागणी आहे. ही संधी साधून काही रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत अव्वाच्या सव्वा दराने विकत आहे. चंद्रपूर येथून जवळच असलेल्या शिवणी चोर येथील वर्धा नदीच्या पात्रातून रेतीतस्करी सुरू होती. याबाबत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी आर. मुरुगानंथम यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकाला नदीपात्रात पाठविले. यावेळी रेतीतस्करी करीत असल्याचे नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या सहकाऱ्याने आढळून आले. पथकाने ट्रॅक्टर जप्त केले असून, तलहसील कार्यालयात जमा केले. या कारवाईमध्ये ट्रॅक्टर एमएच 34 एल 6613, एमएच 34 एल 4479, एमएच 33 व्ही 8472, एमएच 34 एल 6692 या टॅक्टरसह एक बिना नंबरचे ट्रॅक्टरही जप्त केले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी आर. मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या नेतृत्वात मंडल अधिकारी विनोद गणफाडे, विशाल कुरेवार आदींनी केली. (chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top