Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्रकारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
व्हॉइस ऑफ मीडियाच्या शाखा राजूराच्या वतीने देण्यात आले निवेदन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ११ मे २०२३) -         वृत्तपत्रे व...
व्हॉइस ऑफ मीडियाच्या शाखा राजूराच्या वतीने देण्यात आले निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ११ मे २०२३) -
        वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले असून राजुरा तहसील कार्यालय समोर व्हॉईस ऑफ मीडिया तालुका राजुरा च्या वतीने धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी राजुरा मार्फत निवेदन देण्यात आले. (Statement given on behalf of Rajura branch of Voice of Media) (rajura)

        पत्रकारांच्या समस्येचे निवेदन नायब तहसीलदार संजय चिंगलवार यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया चे राजुरा तालुका अध्यक्ष गणेश बेले, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बालसराफ, जिल्हा कार्यवाह सुरेश साळवे, तालुका सचिव वसंत पोटे, तालुका संघटक बादल बेले, दीपक शर्मा, संतोष कुंदोजवार, सागर भटपल्लीवर, प्रफुल्ल शेंडे,  मिलिंद देशकर यांचेसह अनेक पत्रकार उपस्थित होते. (Voice of Media)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top