आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १२ मे २०२३) -
कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना सभापती-उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पाडली. यात सभापतीपदी अशोक बावणे तर उपसभापती पदी वंदना बल्की यांची निवड झाली. (krushi utpanna bazar samiti korpana)
१८ सदस्य संख्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत (Congress) काँग्रेस व (shetkari sanghatana) शेतकरी संघटना - गोंडवाना (gandvana gantantra party) युती कडून सभापती उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात सभापती पदासाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या अशोक बावणे यांना १२ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी संघटना गोंडवाना युतीचे सुनील बावणे यांना ५ मते पडली. तर उपसभापती पदासाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या वंदना बल्की यांना बारा मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी संघटना गोंडवाना युतीचे निशिकांत सोनकांबळे यांना पाच मते पडली.
या बाजार समितीची १८ सदस्य संख्या आहे. यातील एक सदस्य दोन गटातून निवडून आल्याने त्यांना एकच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होता. त्यामुळे १७ सदस्याचेच व्यक्ती नुसार मतदान होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून बल्लारपूरचे सहाय्यक निबंधक मुकुंद मेश्राम, सहाय्यक म्हणून सहाय्यक अधिकारी श्रेणी एक मंगेश दोनाडकर यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या विजय घोषणेनंतर शहरातून विजय रॅली काढन्यात आली. ही निवडणूक काँग्रेसनी राजुराचे आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे (vijay bavane) यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम रणदिवे, संभाजी कोबे, मनोहर चने, भाऊराव चौहान, गणेश गोडे, नितीन बावणे, विनोद नवले, पुंडलिक गिरसावळे, यादव दरणे, अनिल नागपुरे, विजय पिंपलशेंडे, संजय जाधव, सिताराम कोडापे, मुरलीधर बल्की, शैलेश लोखंडे, दीपक खेकारे, विलास आडे, निसार शेख आदी उपस्थित होते. (korpana)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.