Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धोपटाला ओपनकास्ट मध्ये अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डोझरने कामगाराला चिरडले - जागीच मृत्यू आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. 11 मे 2023) -         वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील ध...
डोझरने कामगाराला चिरडले - जागीच मृत्यू
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. 11 मे 2023) -
        वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाणीत मातीचे उत्खनन सुरू असणाऱ्या खाणीतील पृष्ठभागावर डोझर चालकाने येथेच कार्यरत एका सुपरवायझरवर डोझर चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत भीषण अशी ही दुर्घटना दिनांक 9 मे च्या रात्री 12 वाजताच्या दरम्यान घडली. मात्र सबंधित कंपनीने ही घटना रात्री दडवून ठेवली. सकाळी या घटनेबाबत माहिती होताच गावकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उत्खनन व वाहतूक काम बंद केले. दरम्यान राजुरा पोलिसांनी डोझर चालक रवींद्र कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डोझर चालक रवींद्र कुमार हा रात्रीच फरार झाल्याची माहिती मिळाली. (Rajura Police Station) (WCL Ballarpur Area)

        या दुर्घटनेत साईंडीग सुपरवाइजर नागराजू पोनगंटी (32) हा मूळ तेलंगणा येथील रहिवाशी जागीच ठार झाला. त्याच्या अंगावरच डोझर चढविल्याने चैनमध्ये येऊन संपूर्ण शरीर चिरडले गेले. घटनास्थळी देहाचे छोटे छोटे तुकडे व अवयव पसरले होते. रात्रीच या मृत कामगाराचे शरीर हलविण्यात आले. मात्र, येथील कार्यरत कंपनीने कुणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये मोठा रोष होता. रात्री खाणीमध्ये काम सुरू असते. परंतु, येथे दूर दूरपर्यंत लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. सोबतच सुरक्षेबाबत नियमांचे पालन होत नाही, ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथे लाईटची व्यवस्था नव्हती, असा कामगारांचा आरोप आहे. (Dhoptala Opencast)

मोबदला देण्याचा करार
यावेळी इंटक नेता आर. आर. यादव, क्षेत्रीय अध्यक्ष रवी डाहुले, तपासे, आयटकचे नेता दिलीप कनकुलवार, भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे पाडुरंग नंदूरकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन मृतकाच्या कुटुंबाला नियमानुसार मोबदला मिळवून देण्याची हमी दिली. आणि घटनास्थळाचा पंचनामा करून लिखितमध्ये मोबदला देण्याचा करार करण्यात आला.

घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात
सकाळी माहिती झाल्यावर स्थानिक नागरिक व कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तणाव निर्माण झाला. त्यानंतर येथील कार्य बंद करण्यात आले. वेकोलिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून अधिक तपास राजुरा पोलिस करीत आहेत.

माईन्स सेफ्टी टिमकडून चौकशी
दरम्यान सकाळी कामगारांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. या दुर्घटनेची माहिती वेकोलिच्या डायरेक्टर ऑफ माईन्स सेफ्टीच्या नागपूर कार्यालयाला देण्यात आली. ही टीम सध्या दुर्घटनेची कारणांची चौकशी करीत आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top