Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मन कि बात कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरात शेकडो लोकांनी शतक महोत्सवी संवादात दर्शविली उपस्थिती आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) प्रतिनिधी बल्लारपूर -         देशाचे लाडके पंत...
बल्लारपुरात शेकडो लोकांनी शतक महोत्सवी संवादात दर्शविली उपस्थिती
आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) प्रतिनिधी
बल्लारपूर -
        देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा १०० वा भाग नुकताच प्रसारित झाला. देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‛मन की बात’या विशेष कार्यक्रमाचा ऐतिहासिक १०० वा भाग (शतक महोत्सवी संवाद) थेट प्रक्षेपणाद्वारे टिव्ही स्क्रीनवर पाहण्याकरिता स्थानिक प्रभाग क्रमांक १ व २ येथील KGN शाळा, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे लोकांची उपस्थिती दर्शविली होती. 

        यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. रेणुका दुधे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सौ. शुभांगी हरीश शर्मा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे, भाजप नेते गुलशन शर्मा, प्रकाश दोतपेल्ली, अरविंद दुबे, रींकु गुप्ता, श्रीमती सरला लांडे, सौ. शामला डंगोरे, जिल्हा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यां व मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक उपस्थित होते. 

        यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितली कि, “मन की बात’ हे शासनामध्ये लोकांच्या सहभागाचे आणि आपला दृष्टीकोन, सूचना आणि कामगिरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनले आहे” “देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले अनेक विषय मन की बात अधोरेखित करतो”. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top