Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा कृषि उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाजार समितीवर काँग्रेस-भाजप युतीचा झेंडा आमचा विदर्भ  - दीपक शर्मा द्वारे  राजुरा -         राजुरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा न...
बाजार समितीवर काँग्रेस-भाजप युतीचा झेंडा
आमचा विदर्भ  - दीपक शर्मा द्वारे 
राजुरा -
        राजुरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस-भाजप युती ने शेतकरी संघटनेला हादरा देत बाजार समितीवर सत्ता मिळविली. एकूण १८ जागांसाठी ३७ उमेदवार लढत देत होते. निवडणुकीच्या अगोदरच शेतकरी संघटनेच्या एका उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून काँग्रेस पक्षाचे विकास देवाळकर हे अविरोध निवडून आले होते. ग्रामपंचायत मतदार संघातून ३ जागांसाठी ६ उमेदवार, अडते व व्यापारी संघ गटातून २ संचालक पदासाठी ६ उमेदवार तसेच हमाल व मापारी गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत सत्तांतर झाले असून राजुरा कृषि उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस-भाजप युतीचा झेंडा फडकला असून शेतकरी संघटनेला फक्त तीनच जागेंवर समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीत काँग्रेसचे ९, भाजपचे ५ तर शेतकरी संघटनेचे ३ उमेदवार विजयी झाले.  (Congress-BJP alliance flag krushi utpanna bazar samiti rajura)

        विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारन मतदार संघातून अँड. अरुण धोटे (काँग्रेस), उमाकांत धांडे (काँग्रेस), विनोद झाडे (काँग्रेस), सतिष कोमरवेल्लीवार (भाजप), संजय पावडे (भाजप), आशिष नलगे (काँग्रेस) प्रफुल कावळे (शेतकरी संघटना), सेवा सहकारी संस्था महिला गटातून सरीता अजय रेड्डी (काँग्रेस), सौ.विठाबाई हरिदास झाडे (भाजप), सेवा सहकारी संस्था मागासवर्गीय गटातून प्रभाकर ढवस (शेतकरी संघटना), सेवा सहकारी संस्था विमुक्त भटक्या जमाती गटातून तिरुपती इंदूरवार (काँग्रेस), ग्राम पंचायत सर्वसाधारण गटातून जगदीश बुटले (काँग्रेस),  राकेश हिंगाने (काँग्रेस), ग्राम पंचायत अनुसुचित जाती/जमाती गटातून दिलीप देठे (शेतकरी संघटना), ग्राम पंचायत दुर्बल घटक गटातून विकास देवाळकर (काँग्रेस) (अगोदरच अविरोध निवडून आले होते), अडते व व्यापारी मतदार संघातून गोपाल झंवर (अपक्ष), नवनाथ पिंगे (भाजप), हमाल व मापारी गटातून लहू बोन्डे (काँग्रेस) हे विजयी झाले आहे. 

ईश्वर चिट्टीने घ्यावे लागले दोन उमेदवारांची निकाल
अडते व व्यापारी गटातून नवनाथ पिंगे (भाजप) व सागर अडानिया (भाजप) यांचे तसेच हमाल व मापारी गटातून लहू बोन्डे (काँग्रेस) यांना सामान मते मिळाली होती अखेर यांचे निकाल ईश्वर चिट्टीने काढावे लागले. यात सागर अडानिया (भाजप) हे पराभूत झाले. 

सुनील देशपांडे यांनी युती करण्यात बजावली होती मोठी भूमिका
निवडणुकी पूर्वी शेतकरी संघटनेला बाजार समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजप मध्ये युती घडवून आणण्यात नपचे माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी मोठी भूमिका बजावली होती. देशपांडे यांनी आजी व दोन माजी आमदारांमध्ये संवाद घडवून आणला व युतीवर शिक्कामोर्तब झाले व हा विजय मिळविता आला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top