Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैध रेती वाहतूक करणारे दोन हायवे जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक गुन्हे शाखा व विरूर पोलिसांची कारवाई ने रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी  राजुरा / विरूर स्टेश...
स्थानिक गुन्हे शाखा व विरूर पोलिसांची कारवाई ने रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी 
राजुरा / विरूर स्टेशन (दि. 28 एप्रिल 2023) - 
        राजुरा तालुक्यातील धानोरा विरुर मार्गावरून येत असलेल्या दोन हायवा मधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व विरुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाहीत दोन आरोपी सह 30 लाख 2400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Local Crime Branch and Wirur Police Station) (Rajura)

        पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी येथील (Wardha River) वर्धा नदीच्या घाटावरून अवैद्य रेती उपसा करून वाहतूक करीत असल्याचे माहीत पोलीस खबऱ्याकडून मिळाली असता विरुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी सापळा रचून धानोरा-विरुर दरम्यान पुलाजवळ वाहन क्र, MH34 AB 9430 व MH34 BZ1165  या सदर वाहनाची तपासणी केली असता त्यांच्याकडे शासनाचा कोणताही परवाना किंवा वाहतूक टीपी आढळली नाही तसेच जड वाहतुक अधिनियम नुसार सदर वाहनावर कारवाही करीत वाहन चालक दशरथ बसवंते वय 45 रा. जिवती व संतोष चिंचोलकर रा. लाठी सारंडी  याना अटक करण्यात आली. 

        मागील कित्येक दिवसापासून विरुर परिसरातील नाल्यातील तसेच नदीतील रेती घाटावर नियमबाह्य व अवैधरित्या रेती उपसा करीत पाण्याचे स्तोत्र कमी होत आहे त्यामुळे या अवैध रेती तस्करामुळे पर्यावरणावर धोका निर्माण होत आहे, मात्र संबंधित विभाग, खणी कर्म विभाग व महसुल विभाग या गंभीर बाबीकडे कानडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे, परंतु विरुर परिसरातील आजच्या या कारवाई मुळे अवैद्यरित्या रेती वाहूतिक  व गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे. (Unlawful and illegal mining of sand on sand ghats) (sand smuggler)

        सदरची कारवाई विरुर पोलीस स्टेशन ठणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरगेवार, राहुल सहारे, विजय तलांडे, प्रवीण खेर, मिलमले, लक्ष्मीकांत खंडरे, गणेश भोयर, दीपक डोंगरे, गोपीनाथ, गणेश मोहूर्ले यांनी केली. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top