Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बस - दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बसही नाल्यात गेली - पांढरपोवनी जवळील घटना आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २ मे २०२३) -         राजुरा गडचांदूर महामार्गावर बस आण...
बसही नाल्यात गेली - पांढरपोवनी जवळील घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २ मे २०२३) -
        राजुरा गडचांदूर महामार्गावर बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीचालक व त्याच्या मागे बसलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. 

        मिळालेल्या माहितीनुसार पांढरपौनी जवळील नाल्या जवळ असलेल्या एन.एन. ग्लोबल कोल वॉशरीज येथील संदिप सिंह वय 31 वर्ष व अन्य  एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे जात असताना राजुरा येथुन पालगाव कडे जाणाऱ्या बस क्र. एमएच ०७ सी ९५३८ या बसच्या जोरदार धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. (Bus also went into drain - incident near Pandharpovni) (pandharpouni) (rajura) (gadchandur) (accident)

        मिळालेल्या माहितीनुसार सदर बस राजूराहून गड़चांदुर कड़े जात असताना पांढरपौनी जवळील नाल्याजवळ बस आणि दुचाकीत धडक झाली. या धडकीत बस रास्ता सोडून नाल्यात गेली या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र बस मधील प्रवासी सुरक्षित असुन प्रवाश्याना कोणतीही दुखापद झाली नाही. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीकरिता घटनास्थळी घेत पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top