Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "त्या" तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी 25 हजार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांचा पुढाकार आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. २० मार्च २०२३) -         गोंडवाना विद्यापीठ...
सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांचा पुढाकार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. २० मार्च २०२३) -
        गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात विमा संबंधीच्या विद्यापीठाच्या निर्णयाबाबत काय झाले. या संदर्भात सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. होता तसेच दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाविद्यालय चिंचोली येथील कु. छगुना भूषण झाडे व कु.अंजली नंदलाल मेश्राम या दोन विद्यार्थिनींचे शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे परीक्षा देण्यासाठी जात असताना अपघाती निधन झाले तसेच आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील कू.मधुमती सुरेश झाडे या विद्यार्थिनींचे वीज पडून निधन झाले या संदर्भात अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी डॉ. संजय गोरे यांनी सभेमध्ये केली होती.

        दरम्यान या  तिन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

        यासंदर्भात सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाविद्यालय चिंचोली येथील विद्यार्थिनींचा प्रस्ताव विभागाकडे सादर केलेला होता. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या परिषेत्रातील विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी सुरक्षा कवच योजना कार्यान्वित व्हावी यासाठी डॉ. गोरे यांनी आग्रही मागणी केली होती.

        आता विद्यार्थी सुरक्षा कवच योजनेचा लाभ  गोंडवाना परीक्षेत्रातील अंदाजे 73650 विद्यार्थ्यांना मिळणार असून सद्यस्थितीत 35.40 रुपये विद्यार्थी एवढा विमा आकारण्यात आला आहे सदर विद्यार्थ्यांचा जानेवारी ते जानेवारी असा विमा कालावधी राहणार आहे.उपरोक्त अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना  विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 25 हजार रुपयाची रक्कम प्रदान करण्यासंबंधीचे पत्र विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर शैलेंद्र देव यांनी दिनांक 18 मार्च 2023 ला काढले असून यासंदर्भात दोन्ही महाविद्यालयांच्या प्रशासनाने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, सिनेट सदस्य डॉ.संजय गोरे व संचालक डॉ.शैलेंद्र देव व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे. (Senate Member Dr. Initiative of Sanjay Gore)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top