Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सरदार पटेल अभ्यासिकेचा प्रज्योत करमणकर स्पर्धा परीक्षेत यशस्वी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केला सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. २० मार्च २०२३) -         सरदार वल्लभभाई...
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केला सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. २० मार्च २०२३) -
        सरदार वल्लभभाई पटेल अभ्यासिका नगर परिषद राजुरा येथील विद्यार्थी प्रज्योत करमणकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन यांची SAIL (PSU) central goverment of INDIA  मध्ये इंजिनिअर या पदावर निवड झाली असून प्रज्योतच्या या निवडीबदल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सरदार पटेल अभ्यासिकेत त्याची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 

        या प्रसंगी श्री. धोटे यांनी सांगितले की, न. प. राजुरा च्या या अत्याधुनिक सुविधा संपन्न अभ्यासिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच ५ विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. राजुराच्या युवक - युवतींनी या अभ्यासिकेचा लाभ घेऊन यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी सरदार पटेल अभ्यासिकेचे ग्रंथपाल प्रविण बुक्कावार व अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते. (Rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top