गडचांदूर (दि. २० मार्च २०२३) -
समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती कोरपना अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत "दिव्यांग विद्यार्थ्यांचे" उपचारात्मक शिबिर ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे आज सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न झाले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांचे दिव्यांग असेसमेंट करण्यात आले. नंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे वितरित करण्यात येईल. सदर कार्यक्रमाला रजनीकांत सुचकिरे, विनोद बर्डे, लीना झाडे, बंडू झिले, जितेंद्र ओके, सीमा काटकर, आकाश गेडाम, अनिता ठाकरे, डॉक्टर हेमलता सहारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय गाठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्निल टेंभे, डॉक्टर येरमे, डॉक्टर मनीषा यांचे सहकार्य लाभले. (Gadchandur)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.