Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जुन्या पेंशन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची रॅली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संप अधिक तीव्र करण्याचा निर्धार आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १६ मार्च २०२३) -         अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन...
संप अधिक तीव्र करण्याचा निर्धार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १६ मार्च २०२३) -
        अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीला घेऊन राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर यासह अन्य विभागांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आज 15 मार्च ला राजुरा पंचायत समिती चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढून घोषणा देत तहसील कार्यालयाच्या मैदाना पर्यंत जुन्या पेंशन सुरू करण्यासंबंधी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयाच्या आवारात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. (Determined to intensify the strike)

        संपाच्या दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील सरकारी-निमसरकारी, आरोग्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, तहसील, पंचायत समिती, वन विभाग सह अन्य विभागाचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले. राज्यव्यापी संपाने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट आहे. जुन्या पेन्शनसाठी मोर्चा, निदर्शन आणि ठिय्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. 

        जुनी पेन्शन लागू करा या मागणीला घेऊन राज्यव्यापी संपामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, प्रदिप पायघन, किरण लांडे, हंसराज शेंडे, आरोग्य विभाग संघटनेचे पि आए कामडी, सुरेश खाडे, महसूल विभागाचे कु. रंजीता कोहपरे, वनविभागाचे संतोष कुकडे, अमोल बदखल, पंकज गावडे, राजु डाहुले, सुधिर झाडे, दिपक भोपळे, श्रीकांत भोयर यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.


व्हायरल मॅसेजने गोंधळ 
        विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सुरुवातीलाच संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी झाले. मात्र आज सोशल मीडियावर प्रांतीय अध्यक्ष बरडे व विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नावाने व्हायरल झालेल्या मॅसेज मुळे शिक्षक कर्मचारी चांगलेच संभ्रमात पडले. आपला लढा विद्यार्थी व पालकांशी नसून शासनाशी आहे. इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असून बोर्डाचे काम असल्यामुळे बोर्डाला सहकार्य करण्याचा मॅसेज वॉट्स अप ग्रुपवर आला. यामुळे नेमके संपात सहभागी व्हायचे की नाही व्हायचे, यासंबंधी शिक्षक कर्मचाऱ्यात संभ्रम निर्माण झाला. अनेक शिक्षक संपात सहभागी असतांना परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून बोर्डाचे काम करण्यासाठी गेले. शाळेत शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी नसताना पर्यवेक्षक म्हणून कसे जाता येतात, शासनाशी लढा असताना विद्यार्थ्यांचे अध्यापनाचे काम बंद का, यासह अन्य प्रश्न निर्माण करण्यात येत असून यामुळे संपात सहभागी होण्यावरून विमाशी संघटनेत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top