Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब किडनीत अर्धा किलोचा खडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी काढला खडा आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. १६ मार्च २०२३) -         जिल्ह्यातील एका व्...
तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी काढला खडा
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १६ मार्च २०२३) -
        जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या किडनीमधून अर्धा किलोचा खडा निघाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर राऊत (वय ५५) यांच्या किडनीमधून डॉक्टरांनी ३ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हा खडा काढला. प्रभाकर राऊत हे ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी येथील रहिवासी आहेत. (After three hours of surgery, the doctor removed the stone)

        याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रभाकर राऊत यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने अतिवेदना होऊ लागल्या. कुटुंबियांनी त्यांना लगेच ब्रह्मपुरीतील एका खाजगी रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सहमती दर्शवताच डॉ. सुमित जयस्वाल यांनी तीन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तब्बल अर्धा किलो वजनाचा खडा बाहेर काढला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top