Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "एकच मिशन जुनी पेन्शन" साठी कर्मचारी संपावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जुन्या पेंशनसाठी बेमुदत संप सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १४ मार्च २०२३) -         जुनी पेन्शन...
जुन्या पेंशनसाठी बेमुदत संप
सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १४ मार्च २०२३) -
        जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, नर्सेस संघटना, महसूल कर्मचारी, वनविभाग कर्मचारी, ग्रामसेवक संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना, पेन्शन संघटना, पंचायत समिती कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारी, कृषि विभाग तसेच समस्त कर्मचारी संघाच्या वतीने १९८२ ची जुनी पेन्शन योजना चालू करावी, कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क बहाल करावा या व ईतर प्रलंबित मागणीसाठी समस्त विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज दुपारच्या विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात घोषणाबाजी देत तहसीलदारांना निवेदन दिले. 

        म्हातारपणाचा आधार असलेली काठी म्हणजे जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीसाठी तहसील कार्यालयात शेकडोच्या संख्येने कर्मचारी एकत्र येऊन आंदोलन करीत असून यामुळे सर्व सरकारी कार्यालये ओस पडली होती. या आंदोलनाची यामुळे सर्वसामान्यानाही बसली. या आंदोलनात सगळ्याच संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी सहभागी झाले असून जो पर्यंत जुनी पेंशनची मागणी मान्य केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, पुरोगामी शिक्षण समिती राजुराचे अध्यक्ष संदीप कोंडेकर, अखिल प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रदीप पायघन, शिक्षक परिषदचे किरण लांडे, प्रहार शिक्षक संघटना अध्यक्ष हंसराज शेंडे, आरोग्य विभाग अध्यक्ष पी.आर. कामडी, सरचिटणीस सुरेश खाडे, महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य सरचिटणीस रंजना कोहपरे, जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुकडे, जिप आरोग्य संघटना चंद्रपूर अध्यक्ष मधुकर टेकाम, कुष्ठरोग संघटना सहसचिव राजकुमार आत्राम, दिलीप घ्यार, अमोल बदखल, पंकज गावंडे, राजू डाहुले, सुधीर झाडे, दीपक भोपळे, श्रीकांत भोयर, बादल बेले व शेकडो कर्मचारीवृंद उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top