Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा क्षेत्रातील पुरातन मंदिरे व माणिकगड किल्ल्याचे होणार संवर्धन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
  आमदार सुभाष धोटेंच्या प्रश्नावर मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारांचे विधिमंडळात आश्वासन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपुर (दि. १३ मार्च २०२३) - ...
 
आमदार सुभाष धोटेंच्या प्रश्नावर मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारांचे विधिमंडळात आश्वासन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपुर (दि. १३ मार्च २०२३) -
        महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील पुरातन मंदिरे व माणिकगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करणार का? याबाबत शासनाची भूमिका काय अशा प्रश्न उपस्थित करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामधील गड किल्ल्याचे ज्या प्रमाणात संवर्धन शासनाकडून करण्यात येत आहे त्याचधर्तीवर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषता राजुरा विधानसभा क्षेत्रातील श्री सिध्देश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, विष्णू मंदिर आणि माणिकगड किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली. (Minister Sudhir Mungantiwar assurance in the legislature on MLA Subhash Dhote's question)

        यावर उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की आमदार सुभाष धोटे यांनी या आधीही यासंदर्भात मला पत्र देऊन मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला आमचे पूर्ण समर्थन असून त्याला अनुसरूनच श्री सिध्देश्वर मंदिराचा बारा ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. ३८७ संरक्षित स्मारकामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. राजुरा क्षेत्रातील माणिकगड किल्ला व पुरातन मंदिराचे संवर्धन करण्यासाठी लवकरच आ. धोटेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून वेगाने या सर्व मंदिर व किल्ल्याचे संवर्धन करण्यात येईल. श्री सिध्देश्वर मंदिराचे संवर्धन करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये ३८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येईल पहिल्या टप्प्यात १५ कोटी दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात ८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर सोमेश्वर मंदिर, विष्णू मंदिर व माणिकगड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून नियोजनबद्ध कार्यक्रमांतर्गत येथे संवर्धन, सौंदर्यीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top