Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: निःशुल्क आरोग्य शिबीराने जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
९० महिलांनी केली आरोग्य तपासणी विदर्भ बेलदार व तत्सम समाज महिला शाखेचे आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपुर (दि. १३ मार्च २०२३) -        ...
९० महिलांनी केली आरोग्य तपासणी
विदर्भ बेलदार व तत्सम समाज महिला शाखेचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपुर (दि. १३ मार्च २०२३) -
        विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघ जिल्हा चंद्रपुर व शहर महिला कार्यकारीणीचे विद्यमाने जागतिक महिला दिनाचेऔचित्य साधून १२ मार्च ला स्थानिक तारा लाॅन येथे निःशुल्क आरोग्य तपासनी (free health camp) व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. (Organized by Vidarbha Beldar and Tatsam Samaj Women's Branch)

        शिबीराचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी डाॅ. प्रेरणा नरेंद्र कोलते, सौ.नेत्रा इंगुलवार, सौ.पुष्पा कोटेवार, चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ.आरती अंकलवार, चंद्रपुर शहर महिला कार्यकारिणी अध्यक्षा सौ.अपर्णा अंगलवार, सौ.साक्षी कार्लेकर, जेष्ठ समाजसेविका सौ.गंड्रतवार ताई तसेच कार्यक्रम आयोजन महिला समीतीच्या सदस्या उपस्थित होत्या. आरोग्य शिबिराची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कर्मविर दादासाहेब कन्नमवार यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून तसेच द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. मार्गदर्शक व पाहुण्यांचे हरित रोपटे प्रदान करून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातुन सौ.अपर्णा आनंदराव अंगलवार यानी जागतिक महिला दिनाची सुरुवात कधीपासून झाली, भारतात व महाराष्ट्र राज्यात महिला दिनाचे कार्यक्रम आयोजन पध्दत केव्हा पासून सुरु झाली तसेच विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघ द्वारे जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमांचे ध्येय व उद्देश बाबत प्रसंगानुसार दृषटांत द्वारे महत्व पटवून दिले. 
        चंद्रपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डाॅ.प्रेरणा नरेंद्र कोलते यांनी प्रमुख मार्गदर्शनातुन नारी शक्तीचे समाजासाठी प्राचीन काळापासुन तर वर्तमान काळापर्यंतचे महान थोर महिलांचे उदाहरण देऊन जागतिक महिला दिनाचे महत्व तसेच गर्भाशय समस्या, स्तन कँन्सर या विषयावर मार्गदर्शन करत   स्त्रीयांनी स्वतःचे आरोग्याचे संदर्भात वर्तमान काळातील जिवन व खानपान शैलीमुळे आरोग्या विषयी अनेक समस्या वाढत असून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता गर्भाशय व स्तन परिसरातील समस्या बाबत वेळोवेळी तपासणी करत रहावे. म्हणजे मोठ्या धोक्यापासून आपण वाचु शकाल असे मार्गदर्शन केले. 
        डाॅ.प्रणाली डांगेवार यांनी मुळव्याध विषयावर सविसतर मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ.काजल संजय नेरलवार यांनी स्त्रीरोग व आयुर्वेद या विषयावर बोलतांना आयुर्वेद उपचार पद्धतीचे महत्व व फायदे समजावून सांगितले. आयुर्वेदात विविध रोगावर अनेक कमी किंमतीत व विनासाईड इफेक्ट औषधोपचार उपलब्ध असून महिलांनी प्राथमिक स्वरूपात व जर्जर रोगावर आयुर्वेद उपचार करावे असे मार्गदर्शन केले.
        दंत चिकित्सक डाॅ.मृणाली प्रशांत देशकर आणि डाॅ.ऐश्वर्या दिपक डांगेवार यांनीही विविध उपायासह दातांचे विकाराकडे मानवी जीवनात लहानपणापासूनच काळजीपूर्वक दातांच्या समस्यांकडे लक्ष देऊन दातांचे महत्व विशद केले. 
        या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ.प्रभाताई चिलके यांनी नारीशक्ती, नारी जबाबदारी, नारीचे कर्तव्य तसेच सामाजीक भान ठेवून महिलानी आपली शक्ती, कौशल्य व सुप्त गूणांने परिवारासह समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले त्यांनी यावेळी शुर माता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई सह विविध महान थोर महिलांचे उदाहरण  देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सौ.नेत्राताई इंगुलवार, सौ.मंदाताई कोपुलवार, डाॅ.कु. काजल नेरलवार यांनीही मार्गदर्शन केले.  

        या निःशुल्क आरोग्य शिबिरात शेकडो महिला उपस्थित होत्या जवळपास ९० महिलांनी निःशुल्क आरोग्य तपासणी करत शिबिराचा लाभ घेतला. निःशुल्क आरोग्य शिबिराच्या यशस्वितेकरिता सौ.आरती अंकलवार, अपर्णा अंगलवार, साक्षी कार्लेकर, वैशाली कन्नमवार, मनिषा कन्नमवार, ममता पुल्लावार, दिपाली बंडिवार, कविता कन्नमवार, पायल अन्नलदेवार, वैशाली मुत्तेलवार, मीना कोंतमवार, गौरी बेझलवार, शुभांगी कन्नमवार, शितल बेरशेटटीवार, दिव्या चलकलवार, अनुराधा एडलावार सह विविध पदाधिकारी व सदस्यांनी शिबिराचे योग्य नियोजन केले. संचालन राखी रेड्डीवार, ज्योती कार्लेवार यांनी केले तर आभार स्वाती गड्डम यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top