Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दुष्यन्त आत्राम प्रतिनिधी बल्लारपूर (दि. ११ मार्च २०२३) -         महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या व...
आमचा विदर्भ - दुष्यन्त आत्राम प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. ११ मार्च २०२३) -
        महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने महिलांच्या स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने "Skin Care And Advanced Make-Up" या विषयावर एक दिवसीय आंतर महाविद्यालयीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

        याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रेणुका दुधे, सौ कांता ढोके, कार्यशाळेच्या मार्गदर्शिका सौ. मीनाक्षी कुमार, महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. कल्याणी पटवर्धन, प्रा. सौ. सविता पवार, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप  प्रज्वलाने करण्यात आली. 

        कार्यशाळेच्या मार्गदर्शिका सौ. मीनाक्षी कुमार यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायातून कशाप्रकारे व्यवसाय करून महिला सक्षमीकरण होऊ शकते, त्याचप्रमाणे या व्यवसायात स्त्रियांसाठी कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. समाजशास्त्र विभागाच्या वतीने प्रा.सौ कल्याणी पटवर्धन, प्रा.सौ सविता पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.सौ शुभांगी भेंडे शर्मा यांनी स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून आंतर महाविद्यालयीन कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थिनींसाठी केले. या कार्यशाळेला जवळपास साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संचालक संजय कायरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.योगेश टेकाडे, प्रा.डॉ. पंकज कावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे प्रितेश बोरकर, ओम कोराम, स्नेहा गोर, सायली वानखेडे, योगेश हांडे, अश्विनी खोब्रागडे, नेहा मिस्त्री, अनम या विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top