राजुरा (दिनांक १ डिसेंबर २०२२) -
स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने जागतिक एड्स दिवस व एड्स सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एड्स बद्दल जागरूकता निर्माण व्हावी, एड्स चा प्रसार रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन गावखेड्यात जनजागृती करावी असे विविध उद्देश समोर ठेवून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (shri shivaji collage rajura) (rashtriya seva yojana pathak) (world aids day)
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील एड्स विभागातील समुपदेशक पल्लवी डहाळे व लॅब टेक्निशियन रश्मी मुंगुळे यांनी उपस्थित राहून एड्स च्या प्रसाराचे मार्ग, एड्स प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि जर एड्स चे निदान झाले तर काय काळजी घ्यावी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले, यावेळी विद्यार्थ्यांनी मनात असलेल्या भीतीबद्दल प्रश्न विचारून शंकेचे निरसन ही केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. आर.आर. खेरानी, प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ नागनाथ मनुरे, आयोजक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अन्य विद्यार्थीही उपस्थित होते. संचालन कु. प्रतीक्षा वासनिक, प्रास्ताविक प्रा. गुरुदास बलकी आणि आभार सुरज पचारे यांनी केले. (Measures to prevent AIDS)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.