Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महात्मा जोतिबा फुले यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे - डॉ मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना भाजपा महानगर तर्फे आदरांजली आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधि चंद्रपुर -         क्रांतीसूर्य महात्मा ...

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना भाजपा महानगर तर्फे आदरांजली

आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधि

चंद्रपुर -

        क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिन निमित्ताने भारतीय जनता पार्टी महानगराने स्थानिक आझाद बगीचा येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याला नमन करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्र्याला उजाळा दिला तसेच महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आज देखील सर्व समाजाचा विकासासाठी प्रेरक असुन समाजाला दिशा देणारे आहेत असे ही आदरांजली देतांना मत व्यक्त केले. Mahatma jyotiba phoole smrutidin (Dr mangesh gulwade)


        यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ दीपक भट्टाचार्य, सिव्हिल मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. रेणूताई घोडेस्वार, महिला मोर्चा सचिव मोनिषा महातव, सिनेट सदस्य यश बांगडे, भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, संजय पटले, कुणाल गुंडावार, रुपेश चहारे, स्नेहींत लांजेवार, मनीष पीपरे, नितीन कारिया, गोपालकृष्ण अक्केवार, शुभम निंबाळकर, स्वप्निल बनकर, योगेश चौधरी, आकाश वानखेडे, पवन चौधरी, अमोल चौधरी, आकाश डोहाळकर, वैभव निंबाळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top