Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुमठाणा येथे आग लागून गोठा भस्मसात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. १ डिसेंबर २०२२) -           राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथे बुधवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान...
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १ डिसेंबर २०२२) - 
        राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथे बुधवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान धनराज श्यामराव देवाळकर यांच्या गोठ्याला आग लागली. (The barn caught fire) या आगीत दोन बैल व एक गाय होरपळली आणि एक कार आगीच्या भक्षस्थानी पडली. या आगीत काही कोंबड्याही जळाल्या. पहाटेच्या सुमारास अचानक देवाळकर यांच्या गोठ्याला आग लागली. गावकऱ्यांना याची माहिती होताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजुरा येथून अग्निशमन बंब बोलविण्यात येऊन त्यांनी आग विझविली. या आगीमुळे एक बैलजोडी, गाय व तीन जनावरे गंभीर जखमी झाली. गोठ्याजवळ ठेवलेली कार पूर्णपणे जळाली. यामुळे आर्थिक नुकसान झाले. काही कोंबड्याही जळून मरण पावल्या. या आगीत देवाळकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. (Former Mayor Arun Dhote) (sumthana)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top