Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वामन बाबाची १६ महिन्यांची उपवासाची वारी पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी हिरापूर -         विदर्भ हि संतांची कर्मभूमी म्हणून ओळखली जा...
हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
हिरापूर -
        विदर्भ हि संतांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील हिरापूर गावात संत श्री वामन बाबा पावडे यांनी दि. ६ ऑगस्ट २०२१ रोजी अखंड उपवासाला सुरुवात केली होती. या अखंड उपवासाची वारी दि. ६ डिसेंबर २०२२ ला पूर्ण झाली. अखंड सोळा महिने उपवासाला पूर्ण झाले असून अजूनही त्यांची उपवासाची वारी सुरु आहे. 

        उपवासाचा वारीला १६ महिने पूर्ण झाल्यानिमित्य दर्शन सोहळ्याचे आयोजन पंचमुखी नंदीगड सेवा समिती द्वारे करण्यात आले होते. या सोहळ्यात संत वामन बाबा यांनी प्रत्यक्ष सर्व भाविकांना संत विक्तूबाबा, गजानन महाराज, जगन्नाथ बाबा, स्वामी समर्थ महाराज, शिव अवतार, मांगरुळचे भालचंद्र बाबा, पंढरपूचे विठ्ठल यांचे दर्शन दिले. दर्शनाचा लाभ घेण्याकरिता दूर दूर हुन भाविक आले होते. यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

        कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनंता गोखरे, नागोबा मडचापे, उत्तम बोबडे, मोहन पावडे, मारोती गोखरे, संतोष मोहितकर, विष्णू पावडे, सुभाष गोरे, कमलाकर काळे, उमेश गोहोकार, संदीप मोहितकर, गजानन मडावी, पंकज कन्नाके, अनिकेत पावडे, वैभव म्हसे, मंगेश पावडे, गोपाळ निखाडे, अविनाश ठावरी, दयाशंकर बावणे, प्रमोद जेणेकर, प्रवीण पावडे, भालचंद्र पानघाटे, श्रीरंग दुरटकर, देवराव आसुटकर यांनी परिश्रम घेतले. आभार अमोल पावडे यांनी केले. 



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top