Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोळश्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांची धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवैध कोळसा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. १२ डिसेंबर २०२२) -         जिल्ह्यात सध्या ...
अवैध कोळसा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १२ डिसेंबर २०२२) -
        जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोळश्याचा अवैध व्यापार जोमाने सुरु असून अनेक ठिकाणी कोळशाची अवैध तस्करी सुरु आहे. अशीच एक गोपनीय माहिती गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक याना मिळाली, त्या माहितीच्या आधारे कोळशाचा अवैध साठ्यावर धाड मारीत कारवाई केली. (bhoyegao) (gadchandur) (Sub Divisional Police Office, Gadchandur) (Sushil Kumar Nayak)

        धानोरा-गडचांदूर मार्गावर भोयगाव जवळ अवैध कोळशाचा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी स्वतः धाड टाकत लाखोंचा कोळसा जप्त केला. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी कंपनीला जाणारा कोळसाच्या गाडीमधून थोडा-थोडा कोळसा उतरवून व त्याची साठवणूक करून छुप्या पद्धतीने अवैध कोळशाचे व्यापार करणारे व्यापारी यांच्या संगनमताने खुल्या मार्केट मध्ये विकल्या जात होता. (rajura) (coal)

        सदरची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी धाड घालत अवैध चोरीचा कोळसा साठवून व्यापार करणाऱ्या तस्कराचा मुसक्या आवळल्या. लगतच्या राजुरा तालुक्यातही अनेक परिसरात कोळशाच्या अवैध व्यवसाय सुरु असून यांच्या हि मुसक्या आवळा अशी मागणी नागरिक करीत आहे. नायक यांच्या कारवाईमुळे अवैध कोळसा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Illegal business of coal)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top