आमचा विदर्भ - आणता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) तालुका प्रमुख पदी निलेश गंपावार (Nilesh Gampawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलेश गंपावार यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणभाऊ पांडव यांच्या सूचनेनुसार, बाळासाहेबांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख बंडूभाऊ हजारे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते व महिला आघाडी जिल्हा संघटिका योगिताताई लांडगे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. (shivsena jilha pramukh nitin matte) (shivsena sah sampark pramukh bandu hajare) (kiranbhau pandav)
पक्ष संघटना मजबूत करणे, बेरोजगार, शेतमजूर यांच्या हक्कासाठी लढणे, आदिवासी भागातील समस्या शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी तसेच वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त तालुका प्रमुख निलेश गंपावार यांनी सांगितले.
चाळीस आमदारांनी शिवसेनेत उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती आणि दोन गट निर्माण झाले. हे गट निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला गळती लागली असून खासदार, आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आता ग्रामीण परिसरातील कट्टर शिवसैनिकही बाळासाहेबांची शिवसेना ची ढाल तलवार हातात घेत असल्याचे हे आता यावरून आता दिसून येत आहे. राजुरा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना ने दमदार-मनमिळाऊ तालुकाप्रमुख देत दमदार एंट्री केल्याचे म्हटले जात आहे.
निलेश गंपावार हे पूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख होते. त्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुखपद उत्कृष्टपणे सांभाळले होते. मात्र नंतर शिवसेनेतील आपसी मतभेदामुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी शहर प्रमुखपदी असताना केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना ने त्यांना पदोन्नती देत तालुका प्रमुखची जिम्मेदारी दिल्याचे म्हटले जात आहे. (shivsena rajura taluka pramukha)
आज चंद्रपूर येथे झालेल्या बैठकीत निलेश गंपावार यांची राजुरा तालुका पदी तर उपशहर प्रमुखपदी समीर शेख, प्रफुल्ल चौधरी उपतालुका प्रमुख यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यांच्या निवडीबद्दल फयाज खान, आनंद मस्की, राकेश आदे, कृष्णा मेकलवार, निलेश चौधरी, कैलास आदे, राजकुमार गुरुनुले, अक्षय देवाळकर, अनंता गोखरे, दीपक शर्मा यांनी अभिनंदन केले आहे.
00125
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.