आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचा संडासात एक अंदाजे दोन ते तीन महिन्याचे मृत अभ्रक संडासचा निसरा होतो तिथे आतमध्ये फसलेले मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस आली असून याविषयी शहरात चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयाचा वार्ड एक मध्ये पुरुष आणि महिला उपचारार्थ भरती असतात. दि. १२ डिसेंबर पासून संडास चोकअप होता. दि. १३ डिसेंबरचा सकाळी ८ वाजताच्या दरम्यान शौचविधीस जाणाऱ्या रुग्णानी संडास चोकअप झाल्याची तक्रार उपस्थित कर्मचाऱ्यांना केली. चोकअप झालेल्या संडासाची स्वच्छता कारण्याकरीता आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने संडासाच्या निसारा होतो त्या भागात सलाख स्वच्छता करण्याकरिता घातली तर तिथे स्वच्छता करीत असतांना संडासाच्या निसारा होतो तिथे मृत अभ्रक अडकलेले दिसले. मृत अभ्रक दिसताच दवाखान्याचा वॉर्डात एकच खळबळ माजली. स्वच्छता कर्मचाऱ्याने याबाबत लगेच डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टरांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, उपपोलीस निरीक्षक वडस्कर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मृत अभ्रकाचा पंचनामा करून पोस्टमार्टम करिता पाठविण्यात आले. पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध भादंवि कलम ३१५ अन्वये गुन्हा नोंद केला असून अधिकचा तपास सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.