आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ डिसेंबर २०२२२)
शहरातील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल व भुरट्या चोरीच्या घटनेत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आठवडी बाजारात अनेकांची महागडे मोबाईल चोरट्यानी लंपास केले. त्यापैकी काही जणांनी पोलिसात तक्रार दाखल केली, चोरांचा पत्ता पोलिसांना लागतो कि नाही हा वेगळा विषय असून शनिवारी (२४ डिसेंबर) रामपूर येथील व्यापारी मनीष शर्मा, वेकोलि कर्मचारी तुळशीरामजी जेंगठे व एका इसम अशे तीन जणांचे मोबाईल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांतून होत आहे. (Scam of thieves in Rajura) (mobil chor)
शहरात प्रत्येक शनिवारी आठवडे बाजार भरतो खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांचे किमती मोबाईल आणि ऐवज लांबविण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून पोलिस प्रशासनाकडून नियंत्रण केले जात असताना ही चोरट्यानी पुन्हा मोबाईल पळविल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरच शंका उपस्थित होत आहे. दोन पैसे खरेदीतून वाचेल या आशेने आठवडी बाजारात येणाऱ्या लोकांच्या महागड्या मोबाईल व ऐवजावर भामटे चोर डल्ला मारत असून पोलिसांनी या भामट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा, एखादा भामट्या चोर आमच्या हाती लागल्यास त्याचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार यांनी दिला आहे. (shivsena taluka pramukh nilesh gampawar)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.