Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: साखरी ग्राम वासियांची आता अवैध दारू विक्री विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा (दि. २५ डिसेंबर २०२२)         राजुरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून ओळख असलेल्या साखरी (वा) य...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा (दि. २५ डिसेंबर २०२२)
        राजुरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून ओळख असलेल्या साखरी (वा) येथे गेल्या अनेक महिन्या पासून सरार्स अवैध दारू विक्री ला उधाण आले असून यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. गावात चौकात खुलेआम अवैध दारू विक्री बंद करावी व संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (police station rajura)

        साखरी येथील ज्या चौकात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. जवळच मंदिर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह भाविकांना व ग्रामस्थांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलिसांकडे अधिकृत लेखी तक्रार करूनही त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बंद करावी, अशी प्रमुख्याने मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली. याकडे राजुरा पोलिसांनी लक्ष घालून ही अवैध दारू विक्री बंद करणार का हे आता महत्वाचे ठरणारे आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top