Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नागपूर दिनांक (25 डिसेंबर 2022)         हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मह...
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर दिनांक (25 डिसेंबर 2022)
        हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर - राजुरा पर्यंत करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. (Samriddhi Highway) (Sudhirbhau Mungantiwar) (CM Eknath Shinde) (chandrapur - Rajura)


        पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबतचे (Samriddhi Highway) निवेदन सादर केले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासीबहुल वनव्याप्त जिल्हा असून ताडोबा सारख्या राष्ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्यास येत असतात. हा जिल्हा विविध खनिजांनी समृध्द असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे राज्याच्या या भागातील वाहनांना देखील समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकरा सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

        दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्दी महामार्गाचा (Samriddhi Highway) नागपूर ते चंद्रपूर - राजुरा पर्यंत विस्तार करण्यासाठी सविस् प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व भूसंपादन करण्यासाठी अंदाजे २० कोटी रू. निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला उपलब्ध करून देण्याची विनंती मुनगंटीवार यांनी केली होती. अद्याप त्यांच्या सदर विनंतीला मान्यता मिळालेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्यता देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top