Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बिबट्याच्या हल्यात ९ वर्षीय मुलाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील घटना आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना -         चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐव...
कोरपना तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना -
        चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच आहे. वाघ आणि बिबटय़ाच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी आणि जखमी होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोरपना तालुक्यात बिबट्याच्या हल्यात ९ वर्षीय एका शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. (korpana taluka)

        कोरपना तालुक्यातील बेलगाव जामगुड्याला गुड्याला लागूनच आत्राम कुटुंबियांचे शेत आहे. आत्राम कुटुंबीय हे सायंकाळी शेतात शेतीचे कामे आटोपीत होते. त्यांच्या मुलगा नितीन (वय अंदाजे ९ वर्षे) हा रस्त्यात उभा होता. तेव्हा अचानक बिबट्याने त्यावर हल्ला केला व ओढत झुडपी जंगलात नेले. आरडा ओरड होताच थोड्या समोर गाय चारवत असलेल्या देवराव धुर्वे यांनीही आरडाओरड केली नितीनच्या मदतीला गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत नितीनचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा पसरली वनकर्मचारी घटना स्थळ वर पोहचले असून गावकऱ्यांनी हिंसक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top