Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमंत्रानी दिले निर्देश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी पाठपुरावा करत केली होती मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २९ डिसेंबर २...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी पाठपुरावा करत केली होती मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २९ डिसेंबर २०२२) -
        तालुक्यातील माणिकगड पायथ्याशी असलेल्या जामगुळा बेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी लोक वस्ती असलेल्या गावांमध्ये बिबट हल्ल्यामध्ये नववर्षीय युवकाचा जीव गमावला. या गावातील विद्युतीकरण रस्त्यावरील दोन छोट्या पुलाचे बांधकाम व वन विभागाअंतर्गत गावातील सभोवताल तारेचे कुंपण ही मागणी गावकऱ्यांनी केली होती. गावातील विकासापासून कोस दूर असलेल्या या गावाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची दहशत होती. (sudhibhau mungantiwar)

        राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी भेट देऊन गावातील समस्या वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये वन मंत्र्यांची भेट घेऊन वाघाचा जेरबंद करावा तसेच जामगाव येथील समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा असे निवेदन दिले होते. याची दखल घेत तातडीने सीसीएफ, वन विभाग, जिल्हा प्रशासनाला जामगुळा येथील समस्या तातडीने मार्ग लावण्यासाठी नियोजन करा असे निर्देश दिले. यामुळे जामगुळा येथील अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवी झाली आहे. (aabid ali) (palakmantri)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top