Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वच्छता अभियान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दिनांक ६ डिसेंबर २०२२)       श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर य...
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दिनांक ६ डिसेंबर २०२२)
      श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे महामानव डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना राजुरा व पंचायत समितीच्या समोरील परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन केल्या गेले. यावेळी परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला. हे स्वच्छता अभियान युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय, भारत सरकार च्या अधीन राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) यांच्या द्वारे प्रायोजित होते. स्वच्छता ऍक्शन प्लॅन अंतर्गत एकदिवसीय सफाई अभियानाचे आयोजन केल्या गेले. प्लॅस्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम व स्वच्छतेचे महत्त्व जनसामान्यांना समजावून सांगण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय परिसरातून रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्लॅस्टिक बंदी, जलसंवर्धन, पर्यावरण जागरूकता, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देत विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला त्यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे १७७ स्वयंसेवक व अन्य विद्यार्थीही सहभागी होते. (Rashtriya Seva Yojana Pathak) (Swachata Abhiyan) (Rajura)

        मा. कार्तिकेयन सर, रासेयो क्षेत्रीय निदेशक, क्षेत्रीय निदेशालाय पुणे व  डॉ श्याम खंडारे रासेयो संचालक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड यांच्या नेतृत्वात कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की   व रासेयो स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानाचे नियोजन केले. या स्वच्छता अभियानाला मुख्य अतिथी म्हणून आ. शि. प्र. म. . राजुरा चे सचिव श्री अविनाश जाधव, प्रमुख उपस्थिती महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ राजेंद्र मुद्दमवार, डॉ विशाल दुधे, डॉ विठ्ठल आत्राम, डॉ सारिका साबळे, डॉ नागनाथ मनुरे व अन्य प्राध्यापकवृंद उपस्थित होते. (Shri Shivaji Collage Rajura) (Shri Shivaji Mahavidyalay Rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top