राजुरा (दि. ६ डिसेंबर २०२२) -
चंद्रपुरातील प्राचीन ऐतिहासिक रामाळा तलावाला तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा जलपर्णी या वनस्पतीने विळखा घातला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच तलावातील जलचरांच्या जिवांना धोका होईल, अशी चिंता पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. तसेच जीवघेणे दुर्गंधीला लागतच्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही आता अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र, या तलावामुळे शहरातील काही भागातील भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होत आहे.येथे सौंदर्यीकरणासाठी तलावाचा मोठा भाग बुजविण्यात आला आहे. उर्वरित तलावात बाराही महिने पाणी असते. या तलावावर २००८ साली पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले.
तेव्हा उद्योगांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी आधी तलाव कोरडा करण्यात आला. त्यानंतर अनेकदा जलपर्णीने आक्रमण केले. प्रत्येक वेळी हातपाय पसरण्यापूर्वीच मच्छिमार सोसायटीने जलपर्णी बाहेर काढली.त्यामुळे मागील बारा वर्षांत ही वनस्पती वाढली नाही. यावर्षी तलावाच्या खोलीकरणासाठी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, खोलीकरण झाले नाही. पावसाळ्यात घाण पाणी तलावात साचले आणि जलपर्णीने आपले हातपाय पसरले. ही वनस्पती घाण पाण्यातच वाढते. यावेळी तिला पोषक असे पाणी मिळाल्याने तलावाचा बहुतांश भागात आता ती पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.