Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: समतेचा संदेश घराघरात पोहचवा - डॉ.गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महामानवाला महानगर भाजपाची श्रद्धांजली आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर (दि. ७ डिसेंबर २०२२) -         आपल्या कार्यकर्तृ...
महामानवाला महानगर भाजपाची श्रद्धांजली
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर (दि. ७ डिसेंबर २०२२) -
        आपल्या कार्यकर्तृत्वाचा बळावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नाव उज्वल केले.जाती विषमता दूर करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा महामंत्र दिला. यामुळेच देशात लोकशाही प्रस्थापित झाली.त्यांचा समतेचा संदेश घराघरात पोहचवून बंधुत्व प्रत्येकाने जोपासले पाहिजे. भाजपा कार्यकर्त्यांनी हा संदेश घराघरात पोहचवावा, असे आवाहन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले. ते येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्य आयोजित अभिवादन कार्यक्रमात 6 डिसेंबरला बोलत होते. (Vishvratna Dr Babasaheb Ambedkar Mahaparinivan Din) (6 December) (BJP mahanagar chandrapur)

        यावेळी माजी उपमहापौर राहुल पावडे, धम्मप्रकाश भस्मे, सचिन कोतपलीवार, दिनकर सोमलकर, सविता कांबळे, वंदना जामबुळकर ,शीतल गुरूनुले, पुष्पा ऊराडे, रवी गुरूनुले, खुशबू चौधरी,प्रशांत चौधरी,  यश बांगडे, प्रलय सरकार, पप्पू बोपचे, सुनील महातव,राजेश थुल, अमोल नगराळे, अमित निरंजने, सुरेश जामबुळकर,चांद पाशा, स्वप्नील मून, राहुल बनकर,राहुल सूर्यवंशी, हर्षल महातव, रामकुमार अक्केपलीवार, दिवाकर पुदटवार, अरुण रहागंडाले ,शिवम सिंग, कीर्ती भैय्या, नितीन कारिया यांची उपस्थिती होती. (Dr Mangesh Gulwade)

        डॉ.गुलवाडे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामानव डॉ आंबेडकरांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानाला आपला धर्मग्रंथ मानले आहे. संविधानामुळेच लोकशाहीची पाळेमूळे रुजली व मजबूत झाली.संविधानामुळेच आज मातृशक्ती सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे. घराघरात संविधान पोहचविणे हीच खरी श्रद्धांजली विश्वरत्न-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना असेल, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन धम्मप्रकाश भस्मे यांनी तर सविता कांबळे यांनी केले.

भाजपा कार्यकर्त्यांनी घेतले धम्मधातूचे दर्शन
        महामानवाला अभिवादन केल्यानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगीनाबाग येथील धम्मकीर्ती बुद्धविहारात नुकत्याच प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या पगौडा व बुद्धधातूंचे डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात दर्शन घेतले. हे विशेष.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top