Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रगती साधण्याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षण व नवीन तंत्रज्ञान स्विकारणे गरजेचे - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अभ्यास दौऱ्यासाठी ६० शेतकरी बारामतीला रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. ७ ...
अभ्यास दौऱ्यासाठी ६० शेतकरी बारामतीला रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ७ डिसेंबर २०२२) -
        उपविभागीय कृषी विभाग राजुरा च्या वतीने जागतिक मृदा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्याचे मार्गदर्शन आणि एकात्मिक फलोउत्पादन विकास अभियान सन २०२२ - २०२३ मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training) कार्यक्रमाकरिता शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा उपविभागीय कृषी अधिकारी बारामती येथे दिनांक ५ ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी आणि पोंभूर्णा या तालुक्यातील एकूण ६० शेतकरी रवाना करण्यात आले. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या पथकाला हिरवी झंडी दाखवून रवाना केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अभ्यास दौऱ्यासाठी सर्व शेतकर्‍यांना आ. धोटे यांच्या हस्ते बॅग चे वितरण करण्यात आले.  (60 farmers left for Baramati for study tour) (World Soil Day) (Sub Divisional Agriculture Department Rajura)

        या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे आपल्या काळ्या आईवर म्हणजेच शेतजमीनीवर निर्मळ प्रेम असते. मातीच्या आधारावर आणि सुपिकतेवर शेतपीकांची भरभराट अवलंबून असल्याने शेतकरी शेतजमीनीला जीवापाड जपतो. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अती वापर , चुकीचे नियोजन यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीची पोत अबाधित ठेवण्यासाठी प्रमाणित खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि माती परीक्षण करून शेती करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक प्रशिक्षण व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या अभ्यास दौरातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालावी असे मत व्यक्त केले.  (subhash dhote)  (Upvibhagiya krushi adhikari) (rajura)

        या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी चेतन चव्हाण, मंडल कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, मंगेश गुरणुले यासह राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top