Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ओकिनावा नॅशनल कराटे स्पर्धेत राजूराच्या विद्यार्थ्यांचे सुयश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा शहरातील स्पर्धकांचा दमदार विजय आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. ७ डिसेंबर २०२२) -         26 वी ओकिनावा नॅशनल...
राजुरा शहरातील स्पर्धकांचा दमदार विजय
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ७ डिसेंबर २०२२) -
        26 वी ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2022 गुरुग्राम हरियाणा येथे महाराष्ट्र, गोवा, केरला, कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हैदराबाद, तेलंगणा अश्या एकूण वीस राज्यातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला. (26th Okinawa National Karate Championship 2022 Gurugram Haryana)

        या स्पर्धेत राजुरा शहरातील स्पर्धकांनी दमदार विजय मिळवला, या स्पर्धेत शहरातील मनस्वी खिल्लारे (सिल्वर मेडल), जतीन धूल, (सिल्वर मेडल), शुभ्रा गेडाम (सिल्वर मेडल), अनन्या हिंगाने (ब्रांझ मेडल), प्रिया मंगरूळकर (ब्रांझ मेडल), मानसी कामीला (ब्रांझ मेडल,) जानवी मोहूले (ब्रांझ मेडल,) मनस्वी शेंडे (ब्रांझ मेडल), साहिल धुल (ब्रांझ मेडल) पटकावले. 

        शहरातील कु. विधी ने या स्पर्धेत ग्रीन बेल्ट मधून फायटिंग मध्ये भारतातून सिल्वर मेडल प्राप्त केले. गुरुग्राम हरियाणातुन परत आल्यावर स्थानिक बिरसा मुंडा चौक येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, कार्याध्यक्ष रविंद्र आत्राम, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष प्रेम आत्राम, शुभम आत्राम, महिपाल गेडाम विदर्भ सचिव तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कु. विधीचा सत्कार करण्यात आला. कु. विधी कृष्णा गेडाम यांची मुलगी असून भाजपचे वाघुजी गेडाम यांची नात आहे. शहरातील सर्व स्पर्धकांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.  (nidhi gedam rajura) (silver medal)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top