Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नलफडी येथे क्रिकेट सामन्यांचे उदघाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार व विरूर स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांची उपस्थिती आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. २९...
शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार व विरूर स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांची उपस्थिती
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. २९ डिसेंबर २०२२) -
        क्रिकेट हा थरारक आणि लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट सामन्यांत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी क्रीडाप्रेमींसमोर आपली प्रतिभा चमकदारपणे दाखवावी. असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार यांनी केले यावेळी विरूर स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. (Tennis Ball Cricket Matches)

        राजुरा तालुक्यातील नलफडी येथे न्यू आझाद सपोर्टींग क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या सामन्यांचा उदघाटन सोहळा शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार व विरूर स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचा हस्ते पार पडला. यावेळी ग्रापं सदस्य व शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल चौधरी, पत्रकार दीपक शर्मा, सरपंच सुनील टेकाम, उपसरपंच प्रभाकर धानोरकर, पोलीस पाटील राजेश खोब्रागडे, तंटामुक्त अध्यक्ष मनोज धोटे, उंबरे सर, प्रकाश धानोरकर, आडे सर, चंद्रकांत धोटे. गावातील प्रतिष्ठित नागरिक, आझाद सपोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

        विरूर स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी क्रिकेट सामन्याच्या उदघाटनावेळी उत्कृष्ठ फलंदाजी देखील करून महाविद्यालयीन जीवनातील क्रिकेटच्या खेळाबाबतच्या आठवणी सांगितल्या. क्रिकेट सामन्यांच्या यशस्वितेकरिता न्यू आझाद सपोर्टींग क्लबचे अध्यक्ष आकाश पाकुलवार, उपाध्यक्ष सुरज कोडापे, सचिव गणेश टेकाम, सहसचिव अमोल कोडापे, कोषाध्यक्ष सार्थक बावणे, व्यवस्थापक मनोज टेकाम, मार्गदर्शक अमोल आत्राम, तिरुपती मडावी, पंचकमेटीतील अंकित पाकुलवार, प्रतीक मडावी, पंकज धानोरकर, मयूर आत्राम, अजय कोडापे, राजू कोडापे, संतोष बावणे, बंडू टेकाम, बबन चांदेकर, संदीप धानोरकर, आशिष धानोरकर, सुरज उरकुडे, सचिन धानोरकर, सचिन आत्राम, प्रमोद झाडे, सुरेश चित्तकुंटा, राकेश धानोरकर, रुपेश धानोरकर, अमर कोडापे, निखिल खाडे, संतोष कोडापे, किशोर टेकाम, रोशन मडावी, शुभम टेकाम इत्यादींनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top