Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नळ पाइपलाइनचे जीवघेणे खड्डे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विजय ठाकरे यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २९ डिसेंबर २०२२) -         नळ पाइप...
विजय ठाकरे यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २९ डिसेंबर २०२२) -
        नळ पाइपलाइनच्या कामासाठी खोदकाम केलेले खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. अनेक दिवसांपासून शहरातील प्रभाग क्रमांक २, ४ व ७ मध्ये पाणी पुरवठा विभागा अंतर्गत नागरी दलित वस्ती योजना अंतर्गत, पाण्याची वितरण व्यवस्था टाकणे, नळ जोडनी, रस्ता पुनर्सुधारना करने, कामाचे मूल्यांकन करने व वर्क आर्डर नुसार अनियमिता बाबत चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्या बाबतची तक्रार मुख्याधिकारी गडचांदूर याना विजय ठाकरे यांनी केली आहे. 

        शहरात नगर परिषद क्षेत्रात नवीन hdpe पाइप द्वारे नळ योजना पाणी पुरवठा चे कामाचे टेंडर ठेकेदाराने घेतले आहे. ठेकेदाराने घेतलेल्या कामात त्यांना वर्क आर्डर प्रमाणे अटी व शर्तीचे पालन करून नियमानुसार काम करने अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने ज्या-ज्या भागात खोदकाम केले WBM व कॉक्रीट रस्ते जेसीबी मशीन व रॉक ब्रेकर मशीन द्वारे तोडले ते अजुनही पूर्वस्थित जोडले नाही तसेच लेवल केले नाही. प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक ठिकाणी रस्ते तोडल्या गेले पण पूर्ववत केले नाही. पेवरब्लॉक तोडल्या गेले, तेही पूर्ववत लावले नाही. यामुळे एकंदरीत सुपरविजन अभियंता व सहाय्यक कर्मचारी यांचे नियोजन सपशेल फेल ठरले असून यापूर्वी सुद्धा अश्याच भ्रष्ट नियोजनामुळे ११ कोटी रूपयाची पाणीपुरवठा  योजना गलथान कारभाराचा बळी पडली व ११ कोटी चे नुकसान झाले. असा आरोप हि विजय ठाकरे यांनी लावला आहे. 

        मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनात कामाचा दर्जा व अनियमिता तपासून योग्य कार्यवाही करावी अन्यथा लोकायुक्त अधिनियम २०१३ व सुधारित विधेयक २०२२ प्रमाणे सदर तक्रार न्याय प्रविष्ट होईल व त्याची अधिकृत अधिकारी नगर परिषद गड़चांदुर पूर्ण जबाबदार असतील अशी तक्रार केली आहे. आता नप प्रशासन काय कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top