Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिंकले रसिकांची मन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळेला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २९ डिसे...
शाळेला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २९ डिसेंबर २०२२) -
        श्री शिवाजी इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज नांदा फाटाच्या वतीने नुकतेच स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. शाळेला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली. (Shree Shivaji English School and Junior College Nanda Phata) (Affidavit)

        कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. निरल नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्यामसुंदर राऊत, प्रमुख अतिथी म्हणून ॲड. वामनराव चटप, माजी आमदार राजुरा, रवींद्रलाल श्रीवास्तव, कर्नल दीपक डे, मिलिंद देऊडकर, लक्ष्मण देऊळकर, सचिव पौर्णिमा श्रीवास्तव, गावच्या सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, रामदास जोगी, शाळेच्या प्राचार्य अलेक्झांडरीना डिसूजा, विनय श्रीवास्तव, उपप्राचार्य रत्नाकर चटप आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. 
 विविध खेळात सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच दहावी बारावीत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली व उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नाट्यकृती सादर करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचे मूल्य अधीन विषयावरतीही विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात गावातील तसे परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top