Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रसिद्ध व्यापारी रमेश झंवर यांचेवर दुसऱ्यांदा हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लुटीसाठी हल्ल्याचा संशय - सुदैवाने बचावले आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. १ जानेवारी २०२३) -       राजुरा येथील राज...
लुटीसाठी हल्ल्याचा संशय - सुदैवाने बचावले
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १ जानेवारी २०२३) -
      राजुरा येथील राजीव गांधी चौक येथील रहिवाशी व प्रसिद्ध व्यापारी रमेश हनुमान प्रसाद झंवर, वय 45 यांचेवर त्यांच्या आर्वी येथील कॉटन मिल येथून राजुरा शहराकडे येताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात मोटर सायकल स्वारांनी डोक्यावर लाठी मारून हल्ला केला. मात्र सुदैवाने रमेश यांनी स्वतःला सावरून पोलिस ठाण्यात पर्यंत पोहोचले आणि राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी 22 मध्ये त्यांचेवर याच भागात हल्ला झाला होता, मात्र त्यावेळीही ते सुदैवाने बचावले होते. हल्लेखोरांनी लूट करण्यासाठी त्यांचेवर हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे येथे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

        रमेश झंवर यांचे आर्वी येथे कॉटन मिल आहे. येथील कामकाज आटोपून दररोज रात्री ते राजुरा येथे येतात. दिनांक 28 डिसेंबर ला रात्री नऊ वाजता नेहमी प्रमाणे ते दुचाकीने राजुरा कडे निघाले. यावेळी एका मोटरसायकल वर स्वार दोन इसमांनी मागून येऊन एका लाठीने डोक्यावर जोरदार प्रहार केला. मात्र सुदैवाने तो वार थोडा बाजूला बसला तरी यामुळे रमेश यांच्या डोक्याला जखम होऊन रक्ताची धार लागली. मात्र त्याही अवस्थेत ते गाडीने राजुरा पर्यंत आले आणि दवाखान्यात दाखल झाले. यानंतर रात्री राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. रमेश झंवर हे व्यावसायिक असल्याने  रक्कम घेऊन जात असावेत, या संशयातून रात्री त्यांचेवर हल्ला करून लूट करण्याचा इराद्या असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून राजुरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top