Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर -         बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला सा...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बल्लारपूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य विनोद बोलीवर, मुख्य अतिथी म्हणून मूल येथील पत्रकार तथा गायिका कु.कुमुदिनी भोयर, प्रमुख पाहुणे म्हणून  शिक्षिका सौ. दुर्गा कोटगले व सौ.वैशाली पिपरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई जयंती निमित्त भाषण व गायन प्रस्तुत केले. विनोद बोलीवर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या कुमुदिनी भोयर यांनी देशभक्तीपर गीत गायले. संचालन कु. शिरिशा मेडपल्लीवार व शुभांगी मडावी यांनी तर या कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. तोषी जयस्वाल तसेच आभार प्रदर्शन कू.प्रगती खोब्रागडे यांनी केले. (savitribai phule jayanti)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top