पोलीस अधीक्षकांनी दिले तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ८ डिसेंबर २०२२)
राजुरा तालुक्यातील नदी लगत असलेल्या धिडशी, चार्ली, निर्ली, कढोली गावांमध्ये सर्रास अवैध दारू विक्री सुरु असल्याने गावात वातावरण तापत आहे. अवैध दारूविक्रीने घराघरात झगडे-तंटे सुरु असून यामुळे महिला वैतागल्या आहेत. दिवसभर मजुरी करून कष्टाचे पैसे मजूर दारूत उडवीत असल्याने संतापलेल्या महिलांनी धिडशी येथील सरपंच रितूताई हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट यांची ग्रामपंचायत मध्ये भेट घेत समस्या सांगितल्या. उपसरपंच राहुल सपाट यांनी जिप माजी सभापती सुनील उरकुडे (sunil urkude) यांच्याकडे सदर बाब सांगितली.
धिडशी, चार्ली, निर्ली, कढोली गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात जिप माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या मार्गदर्शनात धिडशी ग्रामपंचायत सरपंच कु रितूताई हनुमंते व उपसरपंच राहुल सपाट यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांची भेट घेत अवैध दारूविक्रीवर आला घालण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच, उपसरपंचा सोबत सदस्य संतोष काकडे, मंगला ढोके, सिंधू निखाडे, अमृता पहानपटे, वर्षा ढुमने, पंचफुला काळे, मंजुषा परसुटकर, सिंधू नागपुरे, शोभा बराटे, प्रतिभा काळे, अनिता काळे, वर्षा आत्राम, योगिता थेरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (District Superintendent of Police)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.