Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच 62 जण रिंगणात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
18 डिसेंबरला थेट लोकांमधुन होणार सरपंचाची निवड आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. ८ डिसेंबर २०२२) -         राजुरा ताल...
18 डिसेंबरला थेट लोकांमधुन होणार सरपंचाची निवड
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. ८ डिसेंबर २०२२) -
        राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या विरुर स्टेशनचा थेट सरपंचपदासह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची मदत घेत आजी-माजी सदस्यासोबत उमेदवारांची रेलचेल सुरू झाली आहे. आपणच निवडून येऊ असे दिवास्वप्न उराशी बाडगून 62 जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने प्रथमच इतक्या मोठ्या संख्येत उमेदवारी आल्याने मतदारात उत्सुकता निर्माण झाली आहे. (wirur station) (gram panchayat election)

        अकरा सदस्य संख्या असलेल्या विरूर ग्रामपंचायतीत एकूण चार वार्डांचा समावेश आहे. विरुर हे पेसा गाव योजनेत येत असल्याने सरपंच पद हे अनुसूचित जमाती, सर्वसाधारण करिता आरक्षित आहे, त्यामुळे सरपंच पदाकरिता एकूण 8 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे. 

आर्थिकदृष्‍ट्या मजबुत पण विकासकामत शून्य हि आहे ओळख
        तालुक्यात लोकसंख्येत मोठी व आर्थिकदृष्‍ट्या मजबुत ग्रामपंचायत पण विकासकामत शून्य व गावाचा वाढता विस्तार पाहता अनेक समस्यातून विरूर आजही मुक्त झालेले नाही, अशा या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. म्हणून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी या दृष्टीने मोर्चे बांधणी करीत मतदारांचा कल आपल्या कडे वळविण्यात स्थानिक विविध पक्षाचे नेते प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. 

        आगामी निवडणूकी साठी वार्ड रचनेत फेरबदल झाले असल्याने अनेकांना आनंद तर काहींना अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी अडचणींना मात करीत व पक्षात बंडखोरीचा आघात सहन करीत स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी उमेदवाऱ्याची फळी उभी केली असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. मागील काळात विरुर ग्रामपंचायत वर काँग्रेस ने आपला सरपंच दिला मात्र त्यांना बहुमत मिळविता आले नाही. यावेळी सत्ता मिळविण्यासाठी भाजपा व शेतकरी संघटना आपली सर्व शक्ती पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे असून त्याच प्रमाणे नव्याने संघटन करून शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व काही अपक्ष संघटनानी आपली कंबर कसून मैदानात उतरल्याने गावातील राजकारणाचे समीकरण बदलल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस ला आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. (congrass) (BJP) (shetkari sanghatna) (shivsena - balasaheb/udhav) (vanchit bahujan aaghadi)

        8 तारखेपासून उमेदवार सोशल मीडिया चा वापर करीत प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवाराला गावातील अनेक समस्येचे गाऱ्हाणे मतदारकडून ऐकावे लागणार आहे तेव्हा विविध पक्षाकडून आश्वासनाचा पाऊस पडणार आहे. मात्र यावेळी विकासकामांच्या मुद्यावर मतदान करू असे मतदारांत बोलल्या जात आहे. मात्र 19 डिसेंबर ला कळेल विजयाची माळ कोणत्या पक्षाच्या गळ्यात पडणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top