आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ८ डिसेंबर २०२२) -
गांधी चौकात असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव 7 डिसेंबर ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी गडचांदूरच्या वतीने दत्त जयंती उत्सव चे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता मंदिरापासून पालखी व कलश यात्रा काढण्यात आली. (gadchandur) (korpana)
कलश यात्रेत पुरुष, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशा च्या गजरात निघालेल्या यात्रेने व हरिनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत कलश यात्रा मंदिरात विसर्जित करण्यात आली. मंदिरात भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती. सायंकाळी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी वरदान दुर्गा मंडळ व दत्त मंदिर कमिटी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.