राजुरा -
राजुरा तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या गोवरी कॉलोनी, बाबापूर, मानोली (बूज), कढोली (बूज) नाल्यांतून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने रात्रभर अवैध रेती ची तस्करी होत असताना महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करताना दिसून येत नाही आहे. मध्यंतरी महसूल प्रशासनाने यावर थातुरमातुर कारवाई केली होती मात्र पुन्हा आता जैसे थे परिस्थिती झाली असून खनन व महसूल प्रशासनाच्या गाढ निद्रेने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. सदर ठिकाणी जबाबदारी बजावणारे अधिकारी नसल्याने दिवसा व रात्रभर अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असताना सुद्धा कारवाई केली जात नाही. तालुक्यात सध्या कुठल्या ही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना दररोज रात्रभर नाल्यातून रेती चे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरने रेतीची शासकीय कामावर व नवीन बांधकामाकरिता रेती टाकली जात आहे. महसूल विभागातील उच्च अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्कर मालामाल होत आहेत. तर दुसरीकडे सामान्य व्यावसायिकांच्या वाहनावर महसूल विभागा कडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेती व्यतिरिक्त मुरूमची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांवर अजूनपर्यंत कारवाई झालेली नसल्याने तालुक्यात पुन्हा रेती तस्कर दबंग झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.