Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भंगारात महावितरण इलेक्ट्रिक खांबाचे साहित्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा -         भंगार व्यवसायात मोठ्याप्रमाणात चोरीचे लोखंड, जर्मन, तांबा, इत्यादी दिसून येत आहे. भ...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
        भंगार व्यवसायात मोठ्याप्रमाणात चोरीचे लोखंड, जर्मन, तांबा, इत्यादी दिसून येत आहे. भंगाराचे मोठ मोठे ढिगार भंगार व्यावसायिकांकडे दिसून येत आहे. त्यात वेकोलि, महावितरण इत्यादी विभागातील सामुग्री प्रामुख्याने दिसून येत आहे. या कडे पोलिसांचे हित पूर्वक दुर्लक्ष होत आहे कि काय असे चित्र दिसून येत आहे. जितकेही भंगार विक्रेते शहरात आपला ठाठ मांडून बसले आहे ते सर्व रोडच्या काटेन बसले आहे रोडने जाता-येता सहज भंगाराचा ढिगारा पाहता येऊ शकतो. मात्र पोलिसांचे या कडे हितपूर्वक दुर्लक्ष होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेहमी लोखंड, तांबा, जर्मन, मशनिरी, एल्युमिनियम, डिझेल चोरीच्या तक्रारी दाखल होत असून पोलिसांकडून या भंगार विक्रेत्यांचे दुकान पाहणी केले जाते कि नाही अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top