Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुषपणे मारहाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करा डॉ. मंगेश गुलवाडे, व ब्रिजभूषण पाझरे यांची शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षकांना निवेदनद्वारे मा...
मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करा
डॉ. मंगेश गुलवाडे, व ब्रिजभूषण पाझरे यांची शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षकांना निवेदनद्वारे मागणी
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
गडचांदूर / चंद्रपूर -
        30 ऑक्टोबरला पती-पत्नीचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला, मात्र पोलिसांनी दमदाटी व समजूत न काढता पत्ती ला अमानुषपणे मारहाण केली. प्रकृती बिघडल्याने पतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

        कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे राहणारे 28 वर्षीय अनिकेत भास्कर पावडे यांचे पत्नीसोबत वाद व्हायचे, भांडणाला कंटाळून पत्नीने गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. 30 ऑक्टोबरला पोलिसांनी अनिकेत ला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले. त्यांनतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बेल्ट ने अनिकेत ला अमानुषपणे मारहाण केली, वैद्यकीय उपचारासाठी अनिकेत ला गडचांदूर रुग्णालयात दाखल केले मात्र थातूरमातूर उपचार मारून रात्री तीन वाजता अनिकेत ला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

        अनिकेत ला शारीरिक इजा झाल्याने आई-वडिलांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांनतर अनिकेतची वैदयकीय चाचणी करण्यात आली. अहवालात अनिकेतला बेल्ट ने मारहाण करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत चंद्रपूर भाजप अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांना माहिती कळताच पदाधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले.

        डॉ. गुलवाडे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत अनिकेत ला मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, अनु. जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, जिल्हा सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सदर प्रकरणाची माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी गुलवाडे यांनी चर्चा केली. सदर प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्याशी संपर्क करीत माहिती जाणून घेतली असता अनिकेत पावडे हा दारूच्या नशेत पत्नीला नेहमी बेदम मारहाण करीत होता. त्याबाबत अनिकेत वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेतने जो आरोप पोलिसांवर लावला आहे तो पूर्णतः खोटा आहे. प्रकरण अंगलट आल्यावर त्याने पोलिसांवर खोटा आरोप लावला असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक आमले यांनी दिली. मात्र वैद्यकीय चाचणीत अनिकेत ला बेल्ट ने मारहाण करीत असल्याचे निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादाचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र आहे पण पोलिसांनी बळाचा वापर करीत त्याला बेल्ट ने अमानुषपणे मारहाण करणे कितपत योग्य आहे? 

        गडचांदूर पोलीस स्टेशनमधील बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाची योग्य ती चौकशी करून चौकशीअंती दोषी आढळल्यास दोषी शिपायास तात्काळ निलंबित करण्यात यावे व अनिकेत ला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे डॉ. मंगेश गुलवाडे, जिप माजी समजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझरे यांच्या शिस्टमंडळासह अनिकेतच्या कुटुंबियांनी केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची पाठराखण करतात की कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top