Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मोठे हादरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांचाही राजीनामा आमचा विदर्भ - कार्यालय प्रत...
जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांचाही राजीनामा
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        राष्ट्रवादी काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामा नाट्य घडले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांनी प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठविला आहे. या दोन धक्क्यांनी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

        एका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत वैद्य यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ते दुखावले याच नाराजीतून त्यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्याची चर्चा आहे. बेबीताई उईके यांनी राजीनामा देण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारण सांगितलं आहे. राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नाही असही उईके यांनी सांगितले आहे.

        राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेले. पक्ष वाढीसाठी वैद्य यांनी सातत्याने प्रयत्न केला. परंतु पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण थांबवण्यात त्यांना अपयश आले. यानंतर एका पदाधिकाऱ्याची नियुक्ती करताना वैद्य यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वैद्य पक्षावर नाराज होते. या नाराजीमुळे राजेंद्र वैद्य यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून राजेंद्र वैद्य यांची मनधरणी केली जाणार का, हे पाहावे लागेल. तसे न घडल्यास राजेंद्र वैद्य दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेणार का, याविषयीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top