Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तहसील विभागाचा कारवाईनंतर रेती तस्कर सतर्क
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज दोन ट्रॅक्टर आणि 16 ब्रास रेती साठा जप्त खनिकर्म विभाग झोपेतच रेतीतस्करांमुळे शासनाचा 18 टक्के जीएसटी ही बुडीत खात्यात आमचा विदर्भ - कार्...
आज दोन ट्रॅक्टर आणि 16 ब्रास रेती साठा जप्त
खनिकर्म विभाग झोपेतच
रेतीतस्करांमुळे शासनाचा 18 टक्के जीएसटी ही बुडीत खात्यात
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        राजुरा तालुक्यात रेती उत्खनन, वाहतूक व अवैद्य रेती साठे करणे सुरू असतांना तहसील विभाग करीत असलेल्या कारवाईनंतर रेती तस्कर सतर्क झाले आहेत. आज तिसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या धडक कारवाईत दोन ट्रॅक्टर आणि 16 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. तहसील विभागाकडून बामणवाडा येथून एक तर सातरी येथून एक असे एकूण दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. तहसील विभागाचा कारवाईनंतर रेती तस्कर सतर्क झाले असून देशपांडे वाडी, रामपूर येथील मोठा रेती साठा तस्करांकडून हलविण्यात आला. तत्पूर्वी दि. 3 नोव्हेंबरला जप्त केलेला 47 ब्रास रेती साठा तहसील कार्यालयाचा प्रांगणात आणण्यात आला.

        पावसाळ्यात येथील नदी, नाले या भागात चांगल्या प्रतीची रेती वाहून आली आहे. मात्र, रेती घाटांचे लिलाव होण्यापूर्वीच रेती तस्करांची नजर त्यावर पडली आहे. रेती तस्करांनी महसूल विभागाच्या काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ट्रॅक्टरद्वारे ही रेती उचलून ज्या भागात फारसे लोकांचे जाणे येणे नाही, अशा निर्मनुष्य भागात, परिसरात हे रेती साठे करणे सुरू केले. याची माहिती मिळताच राजुरा व शेजारच्या अनेक गावातील रेती व्यावसायिक लोकांनी किरायाने ट्रॅक्टर लावून रेती नेणे सुरु केले. यासाठी लागणारे चालक व मजूर यांना ज्यादा रोजी देऊन रात्रभर रेती भरून वाहतूक सुरू केली. अखेर जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार झाल्यावर स्थानिक महसूल यंत्रणेला जाग आली आणि काल 47 ब्रास आणि आज 16 ब्रास रेती जप्त करण्यात आली. तरीही सध्या अनेक ठिकाणी रेतीचे साठे दिसत आहेत. मात्र त्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यास महसूल विभाग फारसा उत्सुक नाही. मिळालेल्या माहिती नुसार दोन ठिकाणी जप्त झालेल्या रेती साठ्याची माहिती काही नागरिकांनी दिल्यावरच मग जप्तीची कारवाई करण्यात आली. रेती साठे जप्त होत असताना अद्यापही रात्री रेती चोरी सुरू असून ही रेती वाहून आणणारे ट्रॅक्टर मात्र अद्याप महसूल किंवा खणीकर्म विभागाला सापडले नाहीत. रेतीतस्करांमुळे शासनाचा 18 टक्के जीएसटी ही बुडीत खात्यात जात असून सरकारच्या राजस्वाची मोठी चोरी होत असताना महसूल प्रशासनाने अद्याप यावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा तयार केली नाही. आता जी जाग आली आहे ती जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार झाल्यावर होत असलेली हि कारवाई आहे. सदरची कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी सुभाष साळवे, निरंजन गोरे, पटवारी विल्सन नांदेकर व त्यांच्या चमूने केली.

        तहसील विभागाकडे अनेक जबाबदाऱ्या असूनही नाईलाजास्तव का होईना कारवाई होत असली तरी खनिकर्म विभाग झोपेतच आहे. रेती तस्करांचा वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर काल भंडारा जिल्ह्यात वाळु तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर टिप्पर घालून जीव घेण्याचा प्रयत्न रेती तस्करानी केला. तहसीलदारांना स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला होता. अशी पुनरावृत्ती येथे होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व वेळीच अवैध रेती तस्करांचा मुसक्या आवळाव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top