Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना मध्ये शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील शिवसेनेतील माजी पदाधिकारीही पक्ष प्रवेशाच्या मार्गावर.... जिल्हा प्रमुख नितीन मत्ते जिल्ह्यात पक्षाला बळकट करण्याच्या प्र...
राजुरा तालुक्यातील शिवसेनेतील माजी पदाधिकारीही पक्ष प्रवेशाच्या मार्गावर....
जिल्हा प्रमुख नितीन मत्ते जिल्ह्यात पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांची शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील युवकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांचे नेत्तृत्वावर विश्वास ठेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.

        शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व बंडू हजारे सहसंपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते शिवसेना तालूका व उपजिल्हा पदाधिकारी जाहीर केले. यावेळी ज्यांनी या पक्षप्रवेशात मोलाची भूमिका बजावली असे नितीन मत्ते यांचे खंदे सर्मथक आशिष ठेंगणे उपस्थित होते. कमलेश शुक्ला – उपजिल्हाप्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, नेताजी गहाने तालुका प्रमुख सिंदेवाही, कैलाश कापगाते तालूका प्रमुख सावली, भरत बिराधर तालुका प्रमुख जिवती, राकेश राठोड तालूका प्रमुख कोरपणा, संतोष पारखी तालूका प्रमुख चंद्रपूर, संभा पेंदोर उपतालुका प्रमुख जिवती या पदावर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी जाहीर केली. तसेच पक्षवाढीसाठी व जनसामान्यांना न्याय देवून समाज हिताचे कार्य करून मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हात बळकट करण्याच्या व पक्ष वाढीसंदर्भात सुचना दिल्या. चंदपूर जिल्ह्यातील एक बहुआयामी नेतृत्व म्हणून नितीन मत्ते यांच्याकडे जिल्ह्यातील युवा वर्ग त्यांच्या नेतृवावर विश्वास ठेवताना दिसत आहे. नितीन मत्ते यांचा जनसामान्य नागरिकांत असलेला दांडगा जनसंपर्क व काम करण्याची हातोटी त्यामुळे युवा वर्ग, शेतकरी वर्ग, कामगार, कष्टकरी, समाजातील सर्व घटक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतांना दिसत आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करू असे नितीन मत्ते यांनी सांगितले. या वेळी चेतन घोरपडे यांचेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

        नितीन मत्ते यांच्या याच जनसंपर्कातून राजुरा तालुक्यातील शिवसेनेतील काही कट्टर माजी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रवेशाच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच ते नावलौकिक चेहरे कोण हे समोर येणार असून उद्धवसाहेबांचा शिवसेनेला राजुरा तालुक्यात मोठा हादरा बसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top